मुंबई : चोरीचे मोबाइल घेऊन महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मोबाइल चोराला गुरुवारी जीआरपीने सीएसटी स्थानकात अटक केली. या मोबाइल चोराकडून ८३ मोबाइल हस्तगत करण्यात आले. जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास हातात मोठी बॅग असलेली एक व्यक्ती सीएसटी स्थानकात फिरत होती. या व्यक्तीचा रेल्वे पोलिसांना संशय आल्याने त्याला हटकले आणि त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ८३ मोबाइल आढळले. याबाबत काही उत्तर न दिल्याने आरोपीला जीआरपीकडून अटक करण्यात आली. हा आरोपी दुरोन्तो एक्स्प्रेसने झारखंड येथे पळून जाण्याच्या तयारीत होता.
सीएसटीत मोबाइल चोराला अटक
By admin | Updated: October 30, 2015 00:38 IST