मुंबई : मोबाइल म्हणजे खेळणो नसून लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचे आवाहन अभिनेत्री जुही चावला हिने केले आहे. मोबाइल रेडिएशनसंदर्भातील चर्चासत्रत ती बोलत होती.
मोबाइल रेडिएशनचा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्यावर प्रतिबंध घालण्याची गरज
जुहीने व्यक्त केली. ती म्हणाली, ‘सध्या शासनाने र्निबधित केलेली रेडिएशनची मर्यादा तत्काळ
कमी करण्याची गरज आहे.
नाही तर भविष्यात ऐकू येण्याच्या समस्या, कॅन्सर आणि ब्रेन
टय़ूमरसारख्या आजारांनी जनता त्रस्त होईल. त्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच प्रतिबंध घालण्यात यावा.’
यावेळी अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. देवरा डेविस म्हणाल्या, बाहेरील देशांत रेडिएशनची मर्यादा 1क्क् मिलीव्ॉट
प्रति चौ.मी.हून कमी आहे. याउलट भारतात 45क् मिलीव्ॉट प्रति चौ.मी.ची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
याउलट रशिया, इटली, बल्गेरिया या देशांत 1क्क् मिलीव्ॉट प्रति चौ.मी. असलेली मर्यादाही कमी करण्याचे प्रस्तावित आहे.
कॅन्सरवर सव्रेक्षण करणा:या अनेक संस्था रेडिएशनवर काम
करत आहेत. मात्र निधीअभावी
त्यांच्या सव्रेक्षणात व्यत्यय येत
आहे. त्यामुळे भारताने उशीर होण्याआधीच इतर पाश्चात्त्य
देशांचे उदाहरण डोळ्यापुढे
ठेवून नियमांत बदल करण्याची
मागणी त्यांनी केली.
(प्रतिनिधी)
मोबाइलचा उपयोग लोकांना माहीत असून त्याचे दुष्परिणाम माहीत नसल्याने मोबाइल रेडिएशनची
समस्या सोडवण्यात वेळ लागत असल्याचे जुहीने सांगितले. तरी विविध समुदायांनी एकत्र येत शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकजागृती सुरू आहे. मात्र शासनानेही धोकादायक मात्र नियंत्रित करून रेडिएशनला योग्य मर्यादा घालण्यात वेळ वाया घालवू नये. अन्यथा खूप उशीर झालेला असेल. तरी चित्रपटसृष्टीतील सिनेकलावंतांना या आंदोलनात सामील होण्यासाठी विचारणा करणार असल्याचे तिने सांगितले.