Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीलांबरी बसमध्ये फिरते प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

मुंबई : नीलांबरी बसमध्ये फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम ...

मुंबई : नीलांबरी बसमध्ये फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाॅइंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील.

.............................

सूचना, अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

मुंबई : शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय २२ जानेवारीपर्यंत मागविण्यात आले आहेत. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे.

............................

‘जागर मराठीचा’

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी भाषेची महती सांगणारा ‘जागर मराठीचा’ मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून २८ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या फेसबुक आणि यूट्युब चॅनेलवर रसिकांना पाहता येईल.

......................................