Join us

एसटीतही मनसेचे टायर पंक्चर

By admin | Updated: November 14, 2014 01:50 IST

राज्यातील सर्वात मोठे महामंडळ असलेल्या ‘एसटी’तही (राज्य परिवहन) महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला सभासद सोडचिठ्ठी देत आहेत.

सुशांत मोरे ल्ल मुंबई
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या मनसेला आता आणखी काही धक्के बसत असून राज्यातील सर्वात मोठे महामंडळ असलेल्या ‘एसटी’तही (राज्य परिवहन) महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला सभासद सोडचिठ्ठी देत आहेत. 
मनसेने राज्य परिवहन महामंडळात गेल्या काही वर्षात ब:यापैकी बस्तान बसविले असतानाच मनसे युनियनच्या 4 हजारांपेक्षा जास्त सभासदांनी मान्यताप्राप्त युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
एसटी महामंडळात सध्या 18 युनियन असून, त्यात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एकमेव मान्यताप्राप्त आहे. या संघटनेचे जवळपास 65 हजार सभासद आहेत. सध्या 2015 ची सभासद वर्गणी महामंडळाकडे भरण्याचे काम सुरू असून, त्यासाठी सभासदांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. 30 नोव्हेंबर्पयत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने आणखी काही सदस्य गळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात एसटीचे 30 विभाग असून, ठाणो, पुणो, रायगड, वर्धा, धुळे, सिंधुदुर्ग विभागांतून मनसेच्या सर्वाधिक सभासदांनी मान्यताप्राप्त युनियनचे सदस्यत्व स्वीकारल्याचे सांगण्यात येते. 
 
मनसेच्या सभासदांनी मान्यताप्राप्त युनियनचे स्वीकारलेले सदस्यत्व 
विभागसभासद
ठाणो175
पुणो200
रायगड215
धुळे175
सिंधुदुर्ग125
रत्नागिरी127
नागपूर75
वर्धा250
 
अर्ज भरण्याची
प्रक्रिया नियमबाह्य
मान्यताप्राप्त युनियनची अर्ज भरण्याची प्रक्रिया नियमबाह्य आहे. त्यांच्याविरोधात आम्ही एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करणार आहोत. मान्यताप्राप्त युनियनकडून नुसतेच राजकारण सुरू आहे. संबंधित युनियनमुळेच कर्मचारी व एसटी कर्जबाजारी झाली आहे असे  महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना अध्यक्ष  अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले.