Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या ब्लू प्रिंटचे काउंटडाऊन सुरू

By admin | Updated: September 21, 2014 00:55 IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यापासून पक्ष कार्यकत्र्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यापासून पक्ष कार्यकत्र्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ब्लू प्रिंटच्या प्रतीक्षेत असलेल्या मनसे कार्यकत्र्यानी तिचे काउंटडाऊन सुरू केले आहे.
राज ठाकरे यांनी राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली होती, मात्र कित्येक वर्षे लोटली तरी ब्लू प्रिंट जाहीर होत नसल्याने याबाबत राजकीय स्तरातून आरोप आणि कोटय़ा सुरू होत्या. मनसेच्या अगोदरच शिवसेनेने व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करून चर्चा घडवून आणत विधानसभा निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. त्यामुळे मनसेच्या ब्लू प्रिंटची नव्याने चर्चा सुरू झाली. अखेर राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंट घटस्थापनेदिवशी जाहीर करण्याचे संकेत दिल्याने सर्व कार्यकत्र्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या ब्लू प्रिंटच्या आधारावर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास सध्या कार्यकत्र्यामध्ये आलेली मरगळ दूर होईल, असे कार्यकत्र्याकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटला टक्कर देण्यासाठी राज्याच्या विकासाची मनसेची ब्लू प्रिंट तेवढीच ताकदवान असेल, अशी अपेक्षा कार्यकत्र्याकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
 
च्ब्लू प्रिंटनंतर विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू होईल. यामुळे पक्षाला निवडणुकीत याचा लाभ होईल, अशी अपेक्षाही मनसे कार्यकर्ते बाळगून आहेत.
च्शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटला टक्कर देण्यासाठी राज्याच्या विकासाची मनसेची ब्लू प्रिंट तेवढीच ताकदवान असेल, अशी अपेक्षा कार्यकत्र्याकडून बाळगण्यात 
येत आहे.