Join us

पाकिस्तानी गायकावरून मनसेचा भूषणकुमारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:15 IST

आता मनसेही या वादात उतरली आहे आणि आतिफचे गाणे हटविले नाही तर महागात पडेल, असा इशारा दिला आहे.

मुंबई : पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या गाण्यावरून व्हिडीओ शेअर करत गायक सोनू निगमने टी-सीरिजचे मालक भूषणकुमारवर निशाणा साधल्यानंतर आता मनसेही या वादात उतरली आहे आणि आतिफचे गाणे हटविले नाही तर महागात पडेल, असा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून इशारा देताना म्हणाले, ‘माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्याचे नवीन गाणे तत्काळटी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवरून काढा. याला धमकी समजा, पण या गोष्टी बंद केल्या नाहीत, तर खूप महागात पडेल.’याचवेळी खोपकर यांनी कोरोना काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ‘भाई भाई’ हे गाणे प्रदर्शित करत भाईचारा अबाधित ठेवल्याबद्दल सलमान खानचे कौतुक केले.