Join us

मनसेच्या दडपशाहीने महिला अधिकाऱ्यास आले रडू

By admin | Updated: August 25, 2015 03:01 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे व अन्य कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या उपमुख्य वाणिज्य प्रबंधक स्वाती सिन्हा यांना सोमवारी दमदाटी केल्याने त्यांना

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे व अन्य कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या उपमुख्य वाणिज्य प्रबंधक स्वाती सिन्हा यांना सोमवारी दमदाटी केल्याने त्यांना अक्षरश: रडू कोसळले. मराठी येत नसल्याने त्यांना प्राप्त माहिती अधिकाराखालील अर्जाला उत्तर देण्यास सिन्हा यांनी नकार दिल्याने हे आंदोलन करण्यात आले.सिन्हा यांच्याकडे २२ जून २०१५ रोजी मराठीमध्ये अर्ज केला गेला. त्याला २३ आॅगस्टला दिलेल्या उत्तरात मराठी भाषेतील अर्जावर माहिती देण्यास नकार देण्यात आला. ही बाब मनसेच्या नेत्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी सोमवारी सिन्हा यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी केली. सिन्हा यांना दमदाटी केली व मराठी भाषिकांची जाहीर माफी मागणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. मराठी येत नसल्याने आपण अशी भूमिका घेतली व त्यामुळे मराठी भाषिकांचा अपमान झाल्याबद्दल माफी मागते. भविष्यात मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करीन, अशी हमी देण्यास सिन्हा यांना भाग पाडले. (विशेष प्रतिनिधी)