Join us

मनसेचे नेते अखिल चित्रे यांना खेरवाडीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:05 IST

मनसेचे नेते अखिल चित्रे यांना खेरवाडीत अटकवीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी ...

मनसेचे नेते अखिल चित्रे यांना खेरवाडीत अटक

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अखिल चित्रे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली. गुरुवारी वांद्रे येथील खेरवाडी विभागात हा प्रकार घडला असून सोसायटीतील नागरिकांचा विरोध असलेल्या स्पा केंद्रात वीजजोडणीसाठी कर्मचारी आले असता मारहाणीचा प्रकार घडल्याचे समजते.

खेरवाडीतील एका सोसायटीच्या तळ मजल्यावर दोन गाळ्यांना एकत्र करून स्पा केंद्र तयार करण्यात येत आहे. यासाठी सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा आरोप इमारतीमधील रहिवाशांचा आहे. गुरुवारी येथे वीजजोडणी करण्यासाठी वीजकंपनीचे कर्मचारी आले हाेते. त्यावेळी सोसायटीमधील रहिवाशांनी त्यांना विरोध केला आणि त्यांनी मनसेचे नेते अखिल चित्रेंनाही त्याठिकाणी बोलावले. तेव्हा त्यांनी गाळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

त्यानुसार, चित्रे यांच्यासह सोसायटीमधील अन्य दोन रहिवाशांना अटक करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकुंभे यांना फोन तसेच मेसेज करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क हाेऊ शकला नाही.

.........................