Join us

खारघर टोलनाक्यावर मनसेचा घंटानाद

By admin | Updated: November 11, 2014 01:10 IST

महाराष्ट्राला टोलमुक्त करा ही मागणी घेऊन मनसेने सोमवारी खारघर टोलनाक्यावर घंटानाद आंदोलन छेडले.भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त केला जाईल,

नवी मुंबई : महाराष्ट्राला टोलमुक्त करा ही मागणी घेऊन मनसेने सोमवारी खारघर टोलनाक्यावर घंटानाद आंदोलन छेडले.भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त केला जाईल, असे आश्वासन दिले होते त्याची आंदोलनाच्या माध्यमातून आठवण करून देण्यात आली.
राज्यातील जनतेला टोलमुक्त करण्यात यावे यासाठी मनसे आग्रही आहे. सायन- पनवेल महामार्गावर खारघर येथे नव्याने टोलनाका सुरू होत आहे. मुख्य म्हणजे खारघर टोलनाक्यावरून पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजला होता. तत्कालीन सत्ताधारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफीसाठी आमदारकीचा राजनामा देखील दिला होता. याच मुद्यावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ते व पनवेल विधानसभा मतदार संघातून निवडून देखील आले. भाजपा सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्रासाठी दिलेला शब्द भाजपा पाळत नसल्याची परिस्थिती  उदभवली आहे. याच अनुषंगाने मनसेने हे आंदोलन छेडले. मनसे पदाधिक:यांनी घंटा, टाळ, ढोलकी वाजवत घंटानाद केला. मात्र यात अवघे तीनशेच कार्यकर्ते असल्याने रायगड जिल्हय़ातील गटबाजी चव्हाटय़ावर आली.  (प्रतिनिधी)