Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘मिशन होप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:06 IST

मुंबई : मालाड, येथील जनसेवा समिती संचालित श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालय आणि श्रीमती टी. एस. बाफना ...

मुंबई : मालाड, येथील जनसेवा समिती संचालित श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालय आणि श्रीमती टी. एस. बाफना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘मिशन होप’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात समाजात निर्माण झालेलं भीतीचं वातावरण, कोविडसंबंधीचे गैरसमज दूर करून जनजागृती निर्माण करून समाजात आशावाद निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पात मान्यवर डाॅक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, महानगरपालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था सहभागी विद्यार्थिनी आणि पालकांना मार्गदर्शन करतील.

मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने, व्याख्याते आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये परस्पर संवाद, विद्यार्थिनी व पालक यांच्यासाठी कोविड हेल्पलाइन, रोज विनामूल्य योग वर्ग, गरजू विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य असे या प्रकल्पाचे स्वरूप असेल. सामाजिक बांधिलकी म्हणून अशा कठीण समयी शिक्षण संस्था समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या भावनेतून महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. दीपा शर्मा यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून साकार झालेल्या ह्या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. मोहन पटेल यांच्या हस्ते १५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे; आणि स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ. रंजन मणियार विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

----------------------------------------------