Join us

‘लोकमत’ समूहाने हाती घेतलेले रक्तदान शिबिराचे मिशन ऐतिहासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:05 IST

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली गेली असतानाच आपणाला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासणार आहे. अशा कठीण ...

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली गेली असतानाच आपणाला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासणार आहे. अशा कठीण काळात ‘लोकमत’ समूहाने राज्यभरात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हाती घेतलेले मिशन ऐतिहासिक आहे. या रक्तदानाच्या शिबिरातून जे रक्तदान होणार आहे, तेवढे गेल्या पाच वर्षांत झाले नसेल, असे म्हणत वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सरकारला मदत करण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा लोकमत समूहाचा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे सांगत लोकमत समूहाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकमत समूहाच्या वतीने १ ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ९ जुलै रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्यासह प्रमुख पाहुण्या म्हणून वास्तुविशारद जयश्री भल्ला आणि स्नेहल जलान यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करीत जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन केले. यावेळी प्रतिक्रिया देताना अस्लम शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अस्लम शेख म्हणाले, समाजाचे ऋण फेडण्यासाठी लोकमत समूहाने १ ते १५ जुलैदरम्यान राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी लोकमत समूहाच्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, उपाध्यक्ष मेहुल शाह, खजिनदार अनुप झवेरी, सहसचिव परेश मेहता, सचिव किरण गांधी, सदस्य किरिट भन्साळी, रमणीकलाल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ

बी के सी १ : वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये आयोजित लोकमत समूहाच्या रक्तदान शिबिराचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्यासह प्रमुख पाहुण्या वास्तुविशारद जयश्री भल्ला आणि स्नेहल जलान यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करीत जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन केले. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, सदस्य किरिट भन्साळी, रमणीकलाल शाह उपस्थित होते.

बी के सी २ : लोकमत समूहाच्या वांद्रे - कुर्ला संकुलातील रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.

बी के सी ३ : निलय शाह यांनी आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला.

बी के सी ४ : वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये गुरुवारी आयोजित लोकमत समूहाच्या रक्तदान शिबिरादरम्यान भारत डायमंड बोर्सचे सदस्य किरिट भन्साळी, खासदार गोपाळ शेट्टी, मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड, मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठानच्या ट्रस्टी नीता प्रसाद लाड आणि भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शाह उपस्थित होते.