Join us

पगारवाढीसाठी एसटीत ‘मिस्ड् कॉल’ मतदान!

By admin | Updated: May 11, 2015 04:02 IST

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी याकरिता राज्यभर ५ ते १५ मेदरम्यान ‘मिस्ड् कॉल’द्वारे मतदान घेण्यात येत आहे.

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी याकरिता राज्यभर ५ ते १५ मेदरम्यान ‘मिस्ड् कॉल’द्वारे मतदान घेण्यात येत असून, यापूर्वी झालेला करार रद्द करून २५ टक्के पगारवाढीचा नवा करार केला नाही, तर संपाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला. छाजेड म्हणाले की, महामंडळात २५ टक्के पगारवाढ मिळावी याकरिता ‘मिस्ड् कॉल’द्वारे मतदान घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत हजारो कामगारांनी ‘मिस्ड् कॉल’ दिले आहेत. १५ मेनंतर राज्य परिवहन महामंडळाला ही माहिती देण्यात येईल. (प्रतिनिधी)