Join us

मिस व मिस्टर पर्सनॅलीटी ठरले आकर्षण

By admin | Updated: December 30, 2014 22:35 IST

काल झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत देवेंद्र भोईर याने वसई श्री चा किताब पटकावला.

वसई : काल झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत देवेंद्र भोईर याने वसई श्री चा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता तर रात्री झालेल्या मिस अँड मिस्टर पर्सनॅलिटी स्पर्धेमध्ये अनुक्रमे ऋतुजा रावराणे व रविकिरण गजारे अंतिम विजेते ठरले. महोत्सवाला आज भेट देणाऱ्यांमध्ये सिनेअभिनेते रितेश देशमुख, गोविंदा अहुजा, अंकुश चौधरी, सुशांत शेलार व अन्य मान्यवर उपस्थित होते. वसई कला-क्रीडा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मिस व मिस्टर पर्सनॅलिटी व शरीरसौष्ठव स्पर्धा प्रमुख आकर्षण ठरले. दरवर्षी या दोन्ही स्पर्धांना वसईकर मोठ्या संख्येने आवर्जून हजेरी लावत असतात. यंदा क डाक्याची थंडी असूनही हजारो वसईकरांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. दिवसभर कॅरम, बुद्धीबळ व मैदानी स्पर्धा पार पडल्या तर कला विभागात समूहगायन, वक्तृत्व स्पर्धा, अभिनय, नृत्य व कथाकथन इ. स्पर्धा घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)