मीरा रोड : महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयातच सातवीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. काशिमीरा पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पेणकरपाडा भागातील महापालिकेच्या प्रसाधनगृह परिसरात राहणारी १४ वर्षांची मुलगी तेथे गेली होती. तळ मजल्यावर महिलांसाठीचे शौचालय असून तेथे एका ३० ते ३२ वयोगटातील अनोळखी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. एक महिला प्रसाधनगृहात आली असता ही मुलगी आढळली. तिने परिसरातील रहिवाशांसह पोलिसांना पाचारण केले. मुलीला सुरुवातीला भक्तिवेदान्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
मीरा रोडला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By admin | Updated: January 24, 2017 05:22 IST