Join us

अल्पवयीन बहिणी ३ दिवसांपासून बेपत्ता

By admin | Updated: September 29, 2016 02:31 IST

चेंबूरच्या महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहेत. नातेवाईकांनी दोन दिवस या मुलींचा शोध घेतल्यानंतर, मंगळवारी रात्री चेंबूर

मुंबई : चेंबूरच्या महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहेत. नातेवाईकांनी दोन दिवस या मुलींचा शोध घेतल्यानंतर, मंगळवारी रात्री चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे. राणी (१७) आणि प्रिया (१५) (नाव बदललेली) अशी या मुलींची नावे असून, सोमवारपासून दोघीही बेपत्ता आहेत. राणी ही तेरावीमध्ये शिकते, तर प्रिया ही दहावीमध्ये आहे. सोमवारी दुपारी क्लासला जाण्यासाठी या दोन्ही मुली घराबाहेर पडल्या. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या आईने नातेवाईक आणि मैत्रिणींकडे त्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी रात्रीपर्यंत या मुलींचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा काहीही पत्ता लागत नसल्याने मंगळवारी रात्री मुलींच्या आईने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)