Join us

महाडमध्ये मिनिडोर - कार अपघातात एक ठार

By admin | Updated: May 8, 2015 22:40 IST

महाड तालुक्यातील पडवी - शिवथर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मिनिडोर व झेन कार यांच्यात झालेल्या अपघातात मिनिडोरमधील एकाचा मृत्यू झाला

बिरवाडी : महाड तालुक्यातील पडवी - शिवथर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मिनिडोर व झेन कार यांच्यात झालेल्या अपघातात मिनिडोरमधील एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.याबाबत महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनिडोर रिक्षाचालक मंगेश सुदाम साळुंखे (रा. कुंभेशिवथर) हे सहा प्रवासी घेऊन कुंभेशिवथर येथून बिरवाडी येथे येत होता. यावेळी पडवी गावच्या हद्दीत सकाळी त्यांच्या मागून येणाऱ्या झेन कारने मिनिडोर रिक्षाच्या मागील चाकावर धडक मारल्याने झालेल्या अपघातात मिनिडोर रिक्षामधील प्रवासी रामचंद्र पांडुरंग गोडावले (रा. कुंभेशिवथर) यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर बिरवाडी येथील खाजगी रुग्णालयात तसेच महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामचंद्र गोडावले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)