मुंबई : कामासाठी ओळख करून दिलेल्या एका तरुणानेच चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एक महिन्यापूर्वी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याची ओळख करून देणाऱ्या महिलेविरोधात मेघवाडी पोलिसांनी बलात्कारासह ठार मारण्याची धमकी देणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी तरुणासह महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी जोगेश्वरीतील प्रेमनगर परिसरात आईसोबत राहते. ही मुलगी पूर्वी एका कंपनीत कामाला होती. मात्र तिने ते काम सोडून दिले. दरम्यान ती नवीन कामाच्या शोधात असताना तिच्या परिचित आरोपी महिलेने तिला कामावर लावण्याचे आश्वासन दिले. त्या महिलेनेच आरोपी तरु णाशी ओळख करून दिली होती. पीडित मुलगी त्याच्या घरी कामाला गेली असता तिच्यावर त्याने बलात्कार केला. दुसऱ्या घटनेत वडाळ्यातील संजय गांधी नगरमध्ये घरात कोणीच नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच गावाकडे तिच्या आजोबांचे निधन झाल्याने तिची आई गावी गेली होती. त्यामुळे वडील आणि छोटी बहीण असे तिघे जण राहत होते. या वेळी आरोपींनी मुलीवर अत्याचार केले.
जोगेश्वरी आणि वडाळ्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार
By admin | Updated: December 23, 2014 01:29 IST