बिरवाडी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविल्याची घटना महाड तालुक्यातील मौजे देशमुख कांबळे या गावी घडली आहे. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी एका आरोपीस अटक केली होती. पोलीस कस्टडी दरम्यान सारिका मोरया हिने दिलेल्या माहितीवरून सुनील लक्ष्मण हिरवे याच्यासह अल्पवयीन मुलीला बोरीवली परिसरातून ताब्यात घेतली आहे.मौजे बिरवाडीतर्फे देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील शिंदेकोंड येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून साकडी येथील सुनील हिरवे, आणि मुंबईतील सारिका मोरया (२३) यांनी पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून माणगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. (वार्ताहर)
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची फसवणूक
By admin | Updated: July 3, 2014 23:11 IST