Join us

ट्रॉम्बेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Updated: December 23, 2016 03:38 IST

सहा वर्षीय चिमुरडीला जवळच्या वाड्यामध्ये नेऊन ३६ वर्षीय नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

मुंबई : सहा वर्षीय चिमुरडीला जवळच्या वाड्यामध्ये नेऊन ३६ वर्षीय नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आली. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत किरण वैती या आरोपीला अटक केली आहे. ट्रॉम्बे गाव परिसरात ही मुलगी गुरुवारी दुपारी घराबाहेर एकटीच खेळत असताना या नराधमाने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या आईने हा प्रकार पाहताच आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली व ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (प्रतिनिधी)