Join us

सानपाड्यात अल्पवयीन मुलीला पळवले

By admin | Updated: October 24, 2014 01:02 IST

लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे. याप्रकरणीव तुर्भे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे. याप्रकरणीव तुर्भे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती येथून आलेल्या आणि सानपाडा रेल्वे स्थानकसमोर पदपथावर राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. हे कुटुंब काही दिवसांपुर्वीच नोकरी निमित्ताने अमरावती येथुन नवी मुंबईत आलेले आहे. त्यानुसार बिगारी काम करुन त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. सानपाडा येथे ज्या ठिकाणी हे कुटुंब थांबायचे त्याच परिसरातील रसाच्या दुकानातील कामगारासोबत त्यांची १६ वर्षाची मुलगी सोनी हिची ओळख झाली होती. लहाण भावंडांचा सांभाळ करण्याकरीता ती राहत्या ठिकाणीच थांबायची. मात्र ७ आॅक्टोबरपासून ही मुलगी बेपत्ता झाली. तिच्या घरच्यांनी लगतच्या परिसरात विचारपूस केली असता रसाच्या दुकानातील कामगार नसीम खान (३०) हा देखील बेपत्ता असल्याचे समजले. त्यानुसार घरच्यांनी दोघांविषयी अधिक चौकशी केली असता नसीम याने सोनी हिला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची बाब समोर आली. त्यानुसार सोनी हीच्या कुटुंबीयांनी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)