Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: December 6, 2014 23:28 IST

तुर्भे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी विपुल पाटील या आरोपीस अटक केली आहे.

नवी मुंबई : तुर्भे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी विपुल पाटील या आरोपीस अटक केली आहे. 
तुर्भे परिसरात राहणारी 11 वर्षाची मुलगी 1 डिसेंबरला सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी याच परिसरात राहणा:या विपुल पाटील या तरुणाने तिला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणालाही सांगू नये म्हणून तिला धमकावले. 
शुक्रवारी या मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तेव्हा तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. मुलीला विश्वासात घेतले असता तिने या घटनेविषयी माहिती दिली. याविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. 
एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याविषयी गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ अटक केली आहे. 
आरोपीला न्यायालयात हजर केले असता 1क् डिसेंबर्पयत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याविषयी पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)