Join us

अल्पवयीन मुलीवर कर्जतमध्ये बलात्कार

By admin | Updated: November 2, 2014 00:32 IST

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी कर्जत पालिसांनी चोवीस तासात सातारा येथून आरोपीला अटक केली.

कजर्त : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी कर्जत पालिसांनी चोवीस तासात सातारा येथून आरोपीला अटक केली. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी बिगारी म्हणून काम करत असलेला रायप्पा मुळजे  (35) याची मुद्रे गावातील एका बांधकामच्या ठिकाणी समोरच्या इमारतीमध्ये बिगारी काम करणा-या एका बारा वर्षाच्या मुलीशी ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून 13 ऑक्टोबरला पळवून नेले. याबाबत आपली मुलगी हरवली आहे असा कुटुंबियांचा समज झाला. सर्वत्र तपास केल्यावर मुलगी सापडली नाही. त्यानंतर सतरा दिवसांनी मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 
परिविक्षाधीन पोलीस उपविभागिय अधिकारी विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक एस. एम. जाधव यांनी तपास सुरु  केला. पोलीसांनी अधिक तपास करता त्या मुलीला पळवून नेण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीसांनी तपासाची सुत्रे फिरवल्यावर रायप्पा मुळजे हा तिला सातारा येथे घेऊन गेल्याचे उघड झाले. त्यानुसार सहाय्यक फौजदार एस.एस. शेंबडे व पोलीस कॉंस्टेबल एस.एस. वस्कोटी यांनी जाऊन त्यांना साता-यातून ताब्यात घेतले व कर्जत येथे आणले.  या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)
 
कर्जतला आणल्यावर अल्पवयीन मुलीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखिवले, फिरायला जाऊ आणि तेथे दागिने खरेदी करू असे सांगून रायप्पा मला घेऊन गेला व आपल्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा जबाब दिला.