Join us

अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार

By admin | Updated: December 3, 2014 23:18 IST

शहरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

अंबरनाथ : शहरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. बुवापाड परिसरात राहणाऱ्या या असहाय्य मुलीवर शेजारीच राहणाऱ्या पिंटू राठोड या नराधमाने बलात्कार केला आहे. पिडीतेच्या घरी कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत या नराधमाने तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली. आरोपीचे हे कृत्य पिडीत मुलीच्या बहिणीने बघितल्यानंतर तिला धक्का देऊन तो घराच्या बाहेर पडला. यानंतर त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर तातडीने कारवाई करत अंबरनाथ पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपीला कठोर शासन करीत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पिडीत मुलीच्या आईने केली आहे. (प्रतिनिधी)