Join us

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: October 26, 2015 02:45 IST

कार्टून दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेऊन एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना चेंबूरमधील पी.एल.लोखंडे मार्ग येथे घडली

मुंबई : कार्टून दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेऊन एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना चेंबूरमधील पी.एल.लोखंडे मार्ग येथे घडली. या घटनेतील २३ वर्षीय आरोपीला अटक केली असून तो मुलीचा मामेभाऊ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमाराच ही मुलगी तीच्या घराबाहेर खेळत होती. या मुलीच्या घरा शेजारीच २३ वर्षीय मामेभाऊ राहतो. मुलगी खेळत असतानाच कार्टून दाखवतो असे सांगून त्याने या मुलीला आपल्या घरी नेले आणि बलात्कार केला. मुलगी घरी गेल्यानंतर रडत असल्याचे पाहताच तीच्या आईवडीलांनी याबाबत विचारले असता घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर तिच्या घरच्यांनी टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला त्वरीत अटक करण्यात आली.