Join us

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: March 19, 2015 00:40 IST

घराबाहेर खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी धारावी येथे घडली

मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी धारावी येथे घडली. याबाबत शाहूनगर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.येथील इंदिरा नाका परिसरात ही मुलगी आई-वडिलांसोबत राहते. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेर खेळत होती. याच दरम्यान परिसरात राहणारा अश्रफ शेख (२२) या ठिकाणी आला. याच परिसरात तो बिगारीचे काम करत असल्याने या मुलीच्या तो परिचयाचा होता. त्याने मुलीला खाऊचे आमिष दाखवत त्याच्या घरी नेले. या ठिकाणी त्याने या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा करत तिथून पळ काढत घर गाठले. घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने तत्काळ शाहू नगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)