Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: August 6, 2014 02:47 IST

घरात एकटय़ाच राहणा:या अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून मानखुर्द पोलिसांनी गगनकुमार तिवारी (38) याला अटक केली आहे.

मुंबई: घरात एकटय़ाच राहणा:या अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून मानखुर्द पोलिसांनी गगनकुमार तिवारी (38) याला अटक केली आहे.
मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरात ही 16वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. मात्र वर्षभरापूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाल्याने घरात ही मुलगी आणि तिची चुलत बहीण राहत होती. याच दरम्यान तिचा मानलेला मामा त्यांच्याकडे दररोज येत असे. काकांची मुलगी घरात नसताना आरोपीने अनेकदा या मुलीला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. भीतीपोटी मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र काही दिवसांनंतर आरोपीने मुलगी राहत असलेले घरही त्याच्या नावावर करून घेतले. त्यानंतर पीडित मुलीसोबत राहणा:या तिच्या चुलत बहिणीलाही घराबाहेर काढले. त्यानंतर तोच या घरामध्ये राहू लागला. पीडित मुलीवर आरोपीकडून रोजच अत्याचार होत होते. त्याला विरोध केल्यास मुलीला मारहाण होत असे. अखेर या मुलीने काही महिलांना ही बाब सांगितली. त्यांनी मानखुर्द पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)