Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: July 3, 2016 02:06 IST

भांडुपमध्ये १६ वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. २० वर्षीय भुत्या या गुंडाविरोधात पॉस्को, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : भांडुपमध्ये १६ वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. २० वर्षीय भुत्या या गुंडाविरोधात पॉस्को, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रमाबाई नगरात ही मुलगी राहते. त्याच परिसरात आरोपीही राहतो. सायंकाळी या मुलीला त्याने भांडुप कॉम्प्लेक्सच्या गेटजवळ नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. बदनामी आणि ठार मारण्याची धमकी देत आरोपीने पळ काढला. मुलीने घरी न जाता मैत्रिणीचे घर गाठले. हा प्रकार तिने मैत्रिणीच्या आईला सांगितला. मुलगी गायब झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार केली होती. मैत्रिणीच्या आईसह मुलीने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भुत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भुत्या हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याला पकडण्यासाठी भांडुप पोलिसांनी कोल्हापूर गाठले. मात्र आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.