Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री महोदयांनाच पालिकेत प्रवेश नाकारला

By admin | Updated: May 31, 2015 00:43 IST

परळ येथील बोगदा चाळीच्या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्तांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यालयात आलेले कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांना चक्क पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला़

मुंबई : परळ येथील बोगदा चाळीच्या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्तांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यालयात आलेले कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांना चक्क पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारला़ मेहता यांना ओळखत नसल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते़ भोगदा चाळीच्या पुर्नवसनाच्या विषयावर अतिरिक्त आयुक्तांबरोबर भाजपा आमदार राज पुरोहित यांची बैठक होणार होती़ या बैठकीसाठी खुद्द मंत्री महोदयच मुख्यालयात हजर झाले़ मात्र त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी फौज पाहून सुरक्षा रक्षक गांगरले़ त्यांनी मेहता यांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले़ त्यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते़ राजशिष्टाचारानुसार मंत्री महोदय पालिका मुख्यालयात येत असल्यास पालिका अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर स्वागतासाठी हजर राहणे अपेक्षित आहे़ या घटनेमुळे संतापलेले मेहता यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत यापुढे राजशिष्टाचाराचा पालन करण्याची ताकीद दिली़ आपली चूक लक्षात आलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये मात्र तणावाचे वातावरण पसरले होते़ (प्रतिनिधी)