रोहा : शेणवई येथे मुंबई येथून अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन येणारी मिनी बस मेढाजवळ झाडावर आदळल्याने गाडीतील १९ प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात चालक मनोज परशुराम जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शांताबाई दामाजी गायकवाड (रा. कलिना, मुंबई) यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी शेणवई येथे आणण्यात आले होते. या अंत्यविधीसाठी मिनी बसमधून प्रवास करताना चालकाच्या चुकीमुळे झाडावर आदळले. अपघातात तुकाराम वसंत मोरे, उषा तुकाराम गायकवाड, जयश्री भागूराम गायकवाड, विधी तुकाराम मोरे, प्रतीक्षा विजय जाधव, उषा विजय जाधव, जानू विठ्ठल कांबळे, अश्विनी अनिरुद्ध जाधव, संदीप भागूराम गायकवाड, लीना थॉमस जॉन, सीओना थॉमस जॉन, कल्पना नामदेव पवार, सुरेखा मनोहर गायकवाड, अनिता जानू कांबळे, भगवान पिठाजी दाभाडे, विजय अंबाजी जाधव, नंदा रघुनाथ वाघमारे, मयूर मनोहर गायकवाड यांच्यासह चालक मनोज जाधव हे जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
मिनी बस अपघात; १९ जण जखमी
By admin | Updated: April 8, 2015 22:37 IST