Join us  

रिक्षात मिनरल वाटर, अन मिनी टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:15 AM

लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : कित्येक वेळा भाडे नाकारणे, जास्त पैसे आकरणे यामुळे रिक्षाचालक चर्चेत असतात. पण एक रिक्षाचालक ...

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : कित्येक वेळा भाडे नाकारणे, जास्त पैसे आकरणे यामुळे रिक्षाचालक चर्चेत असतात. पण एक रिक्षाचालक असा आहे त्याने प्रवाशांना रिक्षात टीव्हीची सुविधा आणि मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे नाव आहे विनोद अभंग.

विनोद अभंग हे मानखुर्द येथे राहतात. त्यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांना मोफत मिनरल वॉटर दिले जाते. तसेच रिक्षात बसून तुम्ही कंटाळलात तर तुमच्या करमणुकीसाठी एक मिनी टीव्हीही आहे. रिक्षा चालवताना ते सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. विशेष व्यक्तींना रिक्षा भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते.

बऱ्याच वेळा रिक्षाचालक भाडे नाकारत असतात, पण अभंग हे कोणतेही भाडे नाकारत नसून प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवतात. त्यांच्या समाजसेवेला सलाम आहे, असे प्रवासी प्रसाद जनध्याला यांनी सांगितले.

===Photopath===

011220\fb_img_1606830123352.jpg

===Caption===

रिक्षाचालक विनोद अभंग