Join us

एमआयएम, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाण्यात भिडले

By admin | Updated: September 14, 2014 01:03 IST

तलावपाळी परिसरात एका वृत्तवाहिनीच्या परिसंवादात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते भिडले.

ठाणो : तलावपाळी परिसरात एका वृत्तवाहिनीच्या परिसंवादात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते भिडले. राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी केलेल्या मारहाणीत अकबरुद्दीन ओवेसी गटाचा एक माजी नगरसेवक जखमी झाला. वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनादेखील शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणो आहे. परंतु, आव्हाड यांनी धक्काबुक्कीचा इन्कार केला आह़े
निवडणुकीचे पडघम वाजताच राजकीय राडेबाजीला ठाण्यात सुरुवात झाली आहे. परिसंवादाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होत असतानाच एमआयएमच्या कार्यकत्र्यानी वैद्यकीय शिक्षणमंत्री आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपसात भिडल़े दोन्ही बाजूंकडून प्रचंड धक्काबुक्की करण्यात आली़ विशेष म्हणजे आव्हाडांनाही धक्काबुक्की झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणो आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी माजी नगरसेवक आणि सध्याचे  एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते अश्रफ मुल्लानी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली़ दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकत्र्याना शांत करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या मुल्लानी यांना कौसा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेने ठाण्यातील विशेषकरून मुंब्य्रातील राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरार्पयत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्र ार दाखल करण्यात आली नव्हती.  
यासंदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमात एमआयएमच्या कार्यकत्र्यानी शिवीगाळ केल्याने राष्ट्रवादी कार्यकत्र्यानी माजी नगरसेवकास धक्काबुक्की केली़