Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद शंभरकर समाजकल्याण आयुक्त

By admin | Updated: May 9, 2017 02:17 IST

राज्य सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मिलिंद शंभरकर हे राज्याचे नवे समाजकल्याण आयुक्त असतील.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मिलिंद शंभरकर हे राज्याचे नवे समाजकल्याण आयुक्त असतील. ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. डॉ.अमित सैनींची बदली पुणे, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर, रायगड जिल्हाधिकारी शीतल उगले या पुणे पालिकेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त. अभिजित राऊत सांगली जिल्हा परिषदेचे तर दीपककुमार मिणा नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.