Join us

मध्यरात्री तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: August 20, 2014 02:21 IST

मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रियकरासोबत सिगारेटच्या शोधार्थ भटकणा:या तरूणीला ठार मारण्याची धमकी देत तिघांनी विनयभंग केला. तसेच प्रियकराला लुटून पळ काढला.

मुंबई : मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रियकरासोबत सिगारेटच्या शोधार्थ भटकणा:या तरूणीला ठार मारण्याची धमकी देत तिघांनी विनयभंग केला. तसेच प्रियकराला लुटून पळ काढला. ही घटना रविवारी वांद्रे येथील रहेजा रुग्णालयाजवळ घडली. 
वांद्रे पोलिसांनी तिघांना गजाआड केले. मात्र हा अनपेक्षित प्रसंग ओढवल्यानंतर तरूणी आणि तिच्या प्रियकराला गुन्हा नोंदविण्यासाठी शाहूनगर, धारावी, वांद्रे अशा तीन पोलीस ठाण्यांमध्ये इथून तिथे पळावे लागले. अखेर नऊ तासांनी वांद्रे पोलिसांनी या तरूणीच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वांद्रे वगळता अन्य पोलीस ठाण्यांमध्ये पुरूष अधिका:यांनी आरोपींप्रमाणो चौकशी केल्याचा आरोप तरूणीने केला. याप्रकरणी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी परिमंडळ पाचचे उपायुक्त महेश पाटील यांना तरूणीच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास तरूणीची तक्रार नोंदवून न घेता तिला इथून तिथे पाठवणा:या अधिका:यांवर कारवाई अटळ असल्याचे बोलले जाते. 
याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल शेख आणि फरहाद सैयद या दोघांना अपहरण, विनयभंग, लुटमारीच्या गुन्हयात अटक केली. (प्रतिनिधी)