अजय महाडिक - मुंबई
ठाणो-भिवंडी या अत्यंत वर्दळीच्या प्रवासात मंगळवारी मध्यरात्री वाहक आणि चालकाने शेवटची बस परस्पर रिकामी नेल्याने भिवंडी ते ठाणो प्रवास करणा:या प्रवाशांना पहाटेर्पयत ठाणो स्थानकात अडकून पडावे लागले. एसटी नियंत्रण कक्षावर मिनतवा:या अन् आरडाओरड केल्यावर प्रशासनाला जाग आली. विशेष म्हणजे सदर बस पंक्चर असल्याचे कारण पुढे करण्यात आले असले तरी तशी कोणतीही नोंद ‘त्या’ रात्री नियंत्रण कक्षात करण्यात आलेली नाही.
या गलथान कारभाराची प्रवाशांनी तक्रार क रण्याचा प्रयत्न केला असता एसटी नियंत्रण कक्षाकडे तक्रार रजिस्टर नसल्याची बाब पुढे आली. अखेर साध्या कागदावर तक्रार स्वीकारण्यात आली. रात्री शेवटची मुंबई लोकल ठाणो स्थानकात आल्यावर 1:45 वाजता शेवटची एसटी निघत़े मात्र मंगळवारी मध्यरात्री एसटी वेळेवर आली, अशी नोंद ठाणो कक्षात असली तरी ती परस्पर रिकामी नेल्याने प्रवाशांची गैरसाय झाली. यानंतर प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला घेराव घालून घोषणाबाजी केली़ गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढचा प्रकार टळला. दुदैव म्हणजे यापरिस्थितीचा फायदा स्थानकातील रिक्षावाल्यांनी घेत शंभर रूपये प्रती माणशी असे ठाणो- भिवंडी प्रवासभाडे आकारले.
टायर पंक्चर असल्याचे कारण..
च्मंगळवारी मध्यरात्री भिवंडी आगराहून आलेल्या एसटीचा टायर पंक्चर असल्याचे ठाणो स्थानकात आल्यावर लक्षात आल्याचे बसवाहकाने सांगितले. मात्र ही माहिती कळायला भिवंडीच्या प्रवाशांना पहाटेची वाट बघावी लागली. याबाबत प्रवासी श्रीनिवास दीक्षित व अरकम मोमीन यांनी सांगितले, की वाहकाने तशी कोणतीही सूचना नियंत्रण कक्षाला दिली नव्हती. तसेच ठाणो आणि भिवंडी येथील निरीक्षकांनाही त्याबाबत कोणतीही माहिती नव्हती.
‘रोज मरे त्याला कोण रडे’
च्ठाणो स्थानकात भिवंडीच्या प्रवाशांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळते. उभे राहण्यासाठी शौचालयाजवळची जागा, फुटके शेड आणि रात्री 12 नंतरच्या अनियमित गाडय़ा हा रोजचाच प्रकार असल्याची व्यथा ‘लोकमत’कडे कुतुबुद्दीन खान यांनी मांडली. तर एसटी नियंत्रक पी. यू. राठोड यांनी स्थानकात जादा गाडय़ा असाव्या मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही असे अधोरेखित केले.