Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य - पश्चिम रेल्वेचे मेगा-जम्बोब्लॉक रद्द

By admin | Updated: August 30, 2014 22:58 IST

दोन्ही रेल्वेने रविवारचा मेगा-जम्बोब्लॉक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो गणोशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

डोंबिवली : गणोशोत्सवाला रेल्वेने जाणा:या प्रवाशांची संभाव्य गर्दी अन् त्यामुळे प्रवाशांचे हाल होतील त्यातच मेगा-जम्बोब्लॉकची भर पडू नये अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केली होती, ती मागणी मान्य करून दोन्ही रेल्वेने रविवारचा मेगा-जम्बोब्लॉक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो गणोशभक्तांना दिलासा मिळाला आहे.
मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार होती तसेच पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ-माहीम मार्गावर प.रे.चा  जम्बोब्लॉक असेल असे दोन्ही ठिकाणच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारीच सांगितले होते, मात्र अल्पावधीतच हा निर्णय मागे घेण्यात आला असून, या रविवारसाठी ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
गणोशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणा:या प्रवाशांचे मालगाडी घसरल्याच्या दुर्घटनेमुळे गेला आठवडाभर वेळापत्रक कोलमडल्याने प्रचंड हाल झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना असतानाच मेगा-जम्बोब्लॉक घेतल्यास, उपनगरीय गाडय़ांमधून प्रवास करणा:या गणोशभक्तांचा उद्रेक झाल्यास संभाव्य पडसादाची शक्यता लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासनाने हा सावधपणो  निर्णय घेतल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे.