Join us  

मायकल जॅक्सनच्या शोला मिळाली २४ वर्षानंतर करमणूक करमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 6:40 AM

Michael Jackson: महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार करमणुकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्काच्या आकारणीतून सूट देण्याचा अधिकार शासनास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगविख्यात पॉपस्टार मायकल जॅक्सन याच्या मुंबईत २४ वर्षांपूर्वी झालेल्या पॉप शोचे करमणूक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

  विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. शिवसेना-भाजपा पहिल्‍या युती सरकारच्या कार्यकाळात १ नोव्हेंबर १९९६ रोजी मायकल जॅक्‍सन यांचा पॉप शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता.  मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०११ रोजी या करमणूक शुल्कासंदर्भात आदेश दिला होता.  त्या अनुषंगाने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार करमणुकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्काच्या आकारणीतून सूट देण्याचा अधिकार शासनास आहे. विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि.,मुंबई या संस्थेद्वारे मुंबई येथे १ नोव्हेंबर १९९६ रोजी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या ‘पॉप शो’ पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमास फेरविचारांती करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

उच्च न्यायालयाचा निर्णय n युती सरकारच्या कार्यकाळात१ नोव्हेंबर १९९६ रोजी मायकल जॅक्‍सन यांचा पॉप शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०११ रोजी या शुल्कासंदर्भात आदेश दिला होता. 

टॅग्स :उच्च न्यायालय