Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोमातील रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:57 IST

बिल जास्त झाल्याने कुटुंबाने त्याला ट्रॉमा रुग्णालयात आयसीयूत दाखल केले.

मुंबई : जोगेश्वरीतील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात कोमातील रुग्णाच्या डोळ्याला उंदीर चावल्याचा आरोप रुग्णाच्या वडिलांनी केला आहे.कोमात गेलेल्या परविंद गुप्ता (२७) याच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बिल जास्त झाल्याने कुटुंबाने त्याला ट्रॉमा रुग्णालयात आयसीयूत दाखल केले. दरम्यान सफाई कामाचे निमित्त करत त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्याच्या डोळ्याला उंदीर चावल्याचा आरोप वडील रामप्रताप यांनी केला, पण याबाबत कुठेच तक्रार केली नसल्याचे सांगितले. तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्बन सिंग यांनी आरोप फेटाळला. उंदीर चावला असता, तर इन्फेक्शन झाले असते. मात्र, तसे काहीच झाले नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :हॉस्पिटल