एमएचटी सीईटीसाठी सर्वाधिक विद्यार्थी दरवर्षी बसतात. या वर्षी ५ लाख ०५ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएमसाठी २ लाख २८ हजार ४८६ विद्यार्थी आहेत. तर पीसीबीसाठी २ लाख ७७ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी परीक्षेसाठी वेळ देण्यात आली आहे. राज्यात परीक्षेसाठी एकूण २२६ केंद्रे असणार असून, दर दिवशी यातील सुमारे २०० केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एका सत्रात सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांचे नियोजन केले आहे. यासाठी तालुका व जिल्हा ठिकाणी परीक्षा केंद्राचे नियोजन केले आहे. २५ सप्टेंबरपासून पीसीबी ग्रुप नोंदणी विद्यार्थ्यांची सीईटी होणार आहे.
पीसीएम ग्रुपसाठी पहिल्याच दिवशी ३८ हजार ८१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. मंगळवारी २०० केंद्रांवर परीक्षा झाली. या परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार विद्यार्थ्यांपैकी ८४ टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. १ ऑक्टोबरपर्यंत दररोज दोन सत्रांत अशी दहा दिवस ही परीक्षा सुरू राहणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
कोट
कोरोना निर्बंधाचे नियम पाळून राज्यात ही परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून यासंदर्भात तक्रारी काही नाहीत. नियोजन करून परीक्षा सत्रांचे आणि जवळच्या केंद्रांचे वाटप केले आहे. त्यामुळे फारशी अडचण येत नाही.
- चिंतामणी जोशी, आयुक्त, सीईटी सेल