Join us  

म्हाडाची महागडी घरे आता होणार स्वस्त! मुंबईत आॅक्टोबरमध्ये १००० घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:44 AM

म्हाडाची घरे दिवसेंदिवस महागत आहेत. त्यामुळे लॉटरीसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळेच आता म्हाडा अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च या चारही गटांतील घरांच्या किमती कमी करणार आहे.

मुंबई : म्हाडाची घरे दिवसेंदिवस महागत आहेत. त्यामुळे लॉटरीसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळेच आता म्हाडा अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च या चारही गटांतील घरांच्या किमती कमी करणार आहे. आॅक्टोबरमधील मुंबईसाठीच्या लॉटरीमध्ये हे चित्र दिसणार असून त्यापुढील प्रत्येक लॉटरीत घरांच्या किमती शक्य तितक्या कमी करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.परवडणारी घरे म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. पण म्हाडाच्या गेल्या काही लॉटऱ्यांमध्ये घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या होत्या. याचे ताजे उदाहरण म्हणजे कोकण मंडळाची लॉटरी. कोकण मंडळातील लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील घरांच्या किमती आणि उच्च गटातील घरांच्या किमती जवळपास सारख्याच होत्या. त्यामुळे या घरांना नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. मुंबई मंडळाच्या गेल्या वर्षीच्या लॉटरीमध्ये लोअर परळ, पवई भागातली घरे अल्प व मध्यम गटात असूनही घरांच्या किमती दीड ते दोन कोटींच्या घरात होत्या. त्यामुळे निम्म्याहून अधिक विजेत्यांनी जास्त किमतीमुळे म्हाडाला घरे परत केली. या पार्श्वभूमीवर म्हाडाने महिन्याभरावर आलेल्या मुंबईच्या लॉटरीतील घरांच्या किमतींतील धोरणांमध्ये बदल करण्याचे ठरवले.मुंबई मंडळासाठी आॅक्टोबरमध्ये म्हाडा १ हजार घरांची लॉटरी काढेल. त्याच्या किमती किती कमी करायच्या याबाबत धोरण ठरवण्यात येत असून किमती सर्वसामान्यांना परवडतील, अशाच ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे.अत्यल्प, अल्प गटासाठी जास्त घरेअत्यल्प आणि अल्प गटातील घरे मुंबई मंडळाच्या लॉटरीत जास्तीतजास्त असतील. त्यामुळे या गटातील घरांच्या किमती कमी करण्याकडे आमचा जास्तीतजास्त कल असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :म्हाडामुंबई