Join us

म्हाडाच्या महिला अधिकाऱ्याच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 05:05 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे म्हाडाच्या घरांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या साहाय्यक समाज विकास अधिकारी संध्या लांडगे हिला सोमवारी खेरवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केले.

मुंबई : बनावट कागदपत्राच्या आधारे म्हाडाच्या घरांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या साहाय्यक समाज विकास अधिकारी संध्या लांडगे हिला सोमवारी खेरवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करत ती १२ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तपासाला सहकार्य न करणाºया लांडगेची कसून चौकशी करण्यात येत आहे. यातून म्हाडामधील आणखी काही मोठे घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.