Join us  

म्हाडाला लागणार स्वत:च्याच जमिनींचा ठावठिकाणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 6:09 AM

अतिक्रमण झालेल्या जागांचेही अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू; आठ दिवसांत अध्यक्षांना अहवाल सादर करावा लागणार

- अजय परचुरे मुंबई : मुंबईतीलम्हाडाची नेमकी किती क्षेत्रफळाची जमीन आहे याची माहिती खुद्द म्हाडाच्या अधिकाºयांनाच नाही. यासंदर्भात आठ दिवसांत सर्व माहिती सादर करण्याचे आदेश म्हाडाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिले आहेत. त्यानुसार आता अधिकारी कामाला लागले आहेत. मुंबईतील म्हाडाच्या जागांवर जाऊन किती क्षेत्रफळाची जमीन आहे, यातील कोणत्या जमिनीवर अतिक्रमण आहे याची माहिती ते घेत आहेत.म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबई विभागाची लॉटरी जवळ येऊनही म्हाडाच्या अधिकाºयांना मुंबईत किती क्षेत्रफळाची आपली हक्काची जागा आहे, याची पुसटशीही माहिती नसल्याचे बैठकीत त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाºयांनी ही सर्व माहिती पुढील आठ दिवसांत युद्धपातळीवर टेबलावर ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.एरव्ही गणेशोत्सवात बरेच अधिकारी दीर्घ सुट्टी घेतात. परंतु अध्यक्षांनी दिलेल्या या आदेशामुळे फक्त एक दिवसाची गणेशोत्सवाची सार्वजनिक सुट्टी घेऊन अधिकारी लगेचच दुसºया दिवशी कामावर परतले. इतकेच नव्हेतर, मुंबईतील म्हाडाच्या जमिनीचा शोध घेण्यासाठी ते कामाला लागले आहेत. त्यासाठी उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण या मुंबईतील चार भागांमध्ये चार टीम बनवण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये म्हाडाचा एक वरिष्ठ अधिकारी, अभियंता, दोन कनिष्ठ अधिकारी यांचा समावेश असून गेल्या २ दिवसांपासून मोजणीचे काम मुंबईच्या प्रत्येक विभागात जाऊन ही टीम करीत आहे. ज्या मुंबईतील म्हाडाच्या जमिनींवर कंत्राटदार, बिल्डर, झोपडपट्टीदादा यांनी अतिक्रमण केले आहे, त्या जागेचेही सर्वेक्षण सुरू झाले आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.कायदेशीर कारवाई करणारम्हाडाच्या अधिकाºयांचे काम सुरू असून म्हाडाची मुंबईत किती क्षेत्रफळाची जमीन आहे, याची ठोस माहिती आठ दिवसांनंतर मिळेल. सोबतच अतिक्रमणांबाबतही माहिती हाती येईल. त्यानुसार मुंबईतील म्हाडाच्या जागांवर अतिक्रमण केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास म्हाडाचे अधिकारी सुरुवात करतील. - उदय सामंत, अध्यक्ष, म्हाडा

टॅग्स :म्हाडामुंबई