Join us
Daily Top 2Weekly Top 5

MHADA Lottery 2025: म्हाडा काढणार ४९३ घरांची लॉटरी

By सचिन लुंगसे | Updated: February 7, 2025 19:24 IST

MHADA Nashik Lottery 2025: म्हाडाची लॉटरी दोन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिक येथील विविध २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ४९३ घरांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरुळ, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक, पिंपळ गाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, दसक या ठिकाणी ही घरे आहेत.७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ६ मार्च रोजी सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना ६ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज  सादर करता येईल. ७ मार्च रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरता येईल. ७ मार्च रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा करता येईल. स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादी १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.घरांच्या वितरणासाठी एजंट नेमलेले नाहीत. अर्जदाराने कोणत्याही व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास म्हाडा फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.म्हाडाची लॉटरी दोन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

१) २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण २९१  घरांचा समावेश आहे.२) २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २०२ घरे आहेत. 

 

टॅग्स :म्हाडा लॉटरी