Join us
Daily Top 2Weekly Top 5

दलालांकडून म्हाडाचे अधिकारी टार्गेट

By admin | Updated: August 23, 2015 00:17 IST

सायन प्रतीक्षा नगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये दलालांनी अनेक खोल्यांवर ताबा मिळवला आहे. घुसखोरांना घराबाहेर काढण्याची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना दलालांकडून

मुंबई : सायन प्रतीक्षा नगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये दलालांनी अनेक खोल्यांवर ताबा मिळवला आहे. घुसखोरांना घराबाहेर काढण्याची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना दलालांकडून टार्गेट करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशा आशयाची निवेदने कार्यालयात देण्यात येत असल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत.म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरीची अनेक प्रकरणे वारंवार समोर आली आहेत. सायन प्रतीक्षा नगरातील १० ते १२ खोल्यांवर दलालांनी कब्जा केला आहे. या खोल्यांतील घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना दलालांमार्फत टार्गेट करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची सेवेतील माहिती माहिती अधिकार कायद्यानुसार मागविणे, त्यांच्यावर आरोप करून त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी आर आर मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्याचे प्रकार सुरू आहेत. दलालांनी तक्रार केल्यानंतर एका अधिकाऱ्याची विभागीय चौकशीही अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे आर आर मंडळातील अधिकारीच दलालांना पाठीशी घालत असल्याचे दिसते.संक्रमण शिबिरातील दलाल अधिकाऱ्यांच्या सेवेतील सर्व माहिती आरटीआय कायद्यानुसार मागवत आहेत. एका प्रकरणामध्ये मुख्य माहिती आयुक्तांनी प्रतीक्षा नगरातील दलालांवर कारवाई करण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. अद्यापही या दलालांवर कारवाई झाली नसल्याचे, म्हाडातील कर्मचाऱ्याने सांगितले.