Join us  

म्हाडाच्या अधिकाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याकडून गैरमार्गाने अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:08 AM

अप्पर आयुक्तांचीही दिशाभूल : खार पोलिसांची ‘कर्तबगारी’ वर्षभरानंतर उघडकीस

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम उपनगरातील खार पोलिसांच्या तपास पद्धतीची आणखी एक काळी बाजू तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आली आहे. पाच वर्षांपूर्वी दाखल असलेल्या फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये कसलाही सहभाग नसलेल्या म्हाडाच्या एका अधिकाºयाला साहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी अटक करून तुरुंगात डांबल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला तपास आणि ‘आरटीआय’च्या कागदपत्रातून स्पष्ट झाली आहे.

वरिष्ठ अधिकाºयांनी केलेल्या तपासाचे अहवाल, न्यायालयात दाखल आरोपपत्राची पाहणी न करताच आपल्याकडे तपास नसतानाही पवार यांनी ही कारवाई केली. त्याचबरोबर अप्पर आयुक्त मनोज कुमार शर्मा यांना खोटी कागदपत्रे सादर करून त्यांचीही दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण फेरतपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूषण बेलणकर यांच्याकडे सोपविण्यात आलेआहे.पोलिसांच्या अन्यायामुळे म्हाडातील उपसमाज विकास अधिकारी युवराज संदीपान सावंत यांना अटकेबरोबरच दोन महिने तुरुंगात काढावे लागले.जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर तपासातून ही बाब उघडकीस आणली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयानेसावंत यांचा गुन्ह्यात सहभागनसल्याने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यास स्थगिती दिलीआहे.काय आहे प्रकरण ?म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी योगेश अहिर यांनी सुनीता तुपसौंदर्य, जितेंद्र गाडीया, रवींद्र दरवेश व म्हाडा ठेकेदार युवराज संदीपान सावंत-पाटील यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तत्कालीन निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी तुपसौंदर्य यांना अटक केल्यानंतर त्यांच्यासह फिर्यादी व अन्य दोन साक्षीदार राकेश पवार, केतन पवार यांच्यासह युवराज सावंत यांची पोलीस ठाण्यात बोलावून ओळख परेड घेतली. तेव्हा फिर्यादीने ओळखण्यास असमर्थता दर्शविल्याने युवराज सावंत-पाटील यांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यानंतरही पवार या सावंत यांच्याविरोधात म्हाडा, पंतप्रधान कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करीत असल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला. तसेच कथित संशयित आरोपी सावंत-पाटील याच्यांशी नाम साधर्म्य असल्याने युवराज सावंत यांनी स्वत: २०१७ मध्ये परिमंडळ-९चे तत्कालीन उपायुक्तांकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली होती. त्या वेळी खार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक आर.डी. जाधव यांनी आपला गुन्ह्यात संबंध नसल्याचे त्यांना लेखी कळविले. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी फिर्यादीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अर्ज केल्यानंतर उपायुक्तांनी युवराज सावंत यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावर साहाय्यक निरीक्षक किशोर पवार यांनी सावंत यांना गेल्या वर्षी १८ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावून घेतले.त्यानंतर सावंत यांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध तत्कालीन मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन दाद मागितली. त्यांच्या सूचनेनुसार अप्पर आयुक्त शर्मा यांनी साहाय्यक आयुक्त भूषण राणे यांच्यामार्फत केलेल्या चौकशीमध्ये किशोर पवार यांनी कोणताही सबळ पुरावा नसताना कारवाई केल्याचे स्पष्ट झाल्याने या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडून काढून घेतला. दरम्यान, या प्रकाराबाबत साहाय्यक निरीक्षक पवार यांच्याकडे विचारणा केली असता तपास सुरू असल्याने काही सांगू शकत नसल्याचे सांगत फोन कट केला.फेरचौकशीनंतर पवारयांच्यावर कारवाईसाहाय्यक निरीक्षक पवार यांनी केलेला तपास संशयास्पद असल्याने त्यांच्याकडून तो काढून वांद्रे पोलिसांकडे सोपविला आहे. त्यांच्या तपासाचा अहवाल आल्यानंतर पवार यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल. आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.- मनोज शर्मा,अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभागवरिष्ठाच्या तपासाला केराची टोपलीसावंत यांच्याबाबत पूर्वीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नमूद केलेल्या केस डायरी, अहवालाची पाहणी न करता केवळ साक्षीदार पवार द्वयीने त्यांना ओळखत असल्याचे सांगितल्याच्या आधारावर अटक केली. तेव्हा युवराज सावंत यांना खुलासा करण्याचीही संधी दिली नाही. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात आले. दोन महिन्यांत गुन्ह्याबाबत कोणताच पुरावा न मिळाल्याने सावंत यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

टॅग्स :म्हाडा