Join us

घरे महाग झाल्याने म्हाडा लॉटरीकडे पाठ, अपेक्षित प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 06:44 IST

२६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय खुला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीसाठी आतापर्यंत  ३८ हजार ६२९ अर्ज आले असून, त्यापैकी २१ हजार ६३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. मात्र, यावर्षी म्हाडाच्या घरांच्या किमती जास्त असल्याने अर्जदारांनी लॉटरीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. योजनेला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही.

म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी नियमावली, मार्गदर्शक सूचना, सदनिकांचे विवरण, पात्रतेचे निकष व आरक्षण प्रवर्ग याबाबतची माहिती पुस्तिका https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडोमध्ये इच्छुक अर्जदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी माहिती पुस्तिका पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय खुला आहे. 
  • सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील  रंगशारदा नाट्यगृहात होणार आहे.
  • म्हाडाच्या घराची कमीत कमी किंमत ३० लाख ४४ हजार असून, ही घरे गोरेगाव पहाडी येथे आहेत.
  • वडाळ्यातील अत्यल्प गटातील घराची किंमत ४० लाख
  • कन्नमवार नगरातील अत्यल्प गटातील घराची किंमत ३४ लाख ७४ हजार
  • कन्नमवार नगरातील अत्यल्प गटातील घराची किंमत ३६ लाख १६ हजार
  • मालाड, मालवणी येथे अल्प गटासाठी असलेल्या घराची किंमत ३१ लाख ५ हजार ४७०
  • चांदिवली येथील अत्यल्प गटासाठी असलेल्या घराची किंमत २४ लाख ७१,७३३
  • मानखुर्द येथील अत्यल्प गटासाठी असलेल्या घराची किंमत २६ लाख २६, ५४
  • सोडतीत  सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करायची आहेत.
  • अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा प्राप्तीकर विवरण पत्र हे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सादर करायचे आहे.
  • सर्व कागदपत्रे सादर करणारे अर्जदार हे संगणकीय सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र ठरतील.
टॅग्स :म्हाडामुंबई