Join us

म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीत एक तासात तीन हजार अर्जांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:06 IST

मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या अर्जांची नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या एक तासातच तीन हजार अर्जांची विक्री झाली. ...

मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या अर्जांची नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या एक तासातच तीन हजार अर्जांची विक्री झाली. एका घरासाठी अडीचशे लोकांची मागणी असल्याचे चित्र आहे.

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ मंगळवारी ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.

२४ ऑगस्टपासून सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्ज नोंदणीची सुरुवात झाली आहे. अर्ज नोंदणीची प्रक्रिया २२ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा शेवटची दिनांक व वेळ २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अनामत रकमेच्या ऑनलाइन स्वीकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अनामत रकमेचा भरणा बँकेत ऑनलाइन २४ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छुक अर्जदारांकरिता संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे.