मुंबई : मुंबईत घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा प्रयत्न करत असून नव्या वर्षामध्ये अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. दिवाळीत लॉटरी काढली जाईल. त्यात अत्यल्प व अल्प गटासाठी अधिकाधिक घरे राखीव ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती म्हाडा प्राधिकरणाने दिली.
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून वर्षातून किमान दोन लॉटरी काढल्या जातात. कोकण मंडळासोबतच मुंबई मंडळाच्या लॉटरीला नागरिकांकडून सर्वाधिक प्रतिसाद दिला जातो.
कुठे, कुठे घरे असतील?- गोरेगाव पहाडी : दोन वर्षांमध्ये अडीच हजार घरे बांधली जाणार आहेत. नव्या वर्षात यातील काही घरांचा समावेश लॉटरीमध्ये होईल. अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे बांधण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.- अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे घरे असतील.
घराची किंमत किमान २७ लाख ठेवा‘लोकमत’ने म्हाडाच्या वाढीव किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर माजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेत घरांच्या किमती कमी केल्या होत्या. आता नवीन सरकार आल्यानंतर काढण्यात येणाऱ्या घरांच्या किमती नेमक्या किती असतील? हे आकडे गुलदस्त्यात असले तरी सर्वसाधारण म्हाडाच्या घराची किंमत ३४ लाखांपासून सुरू होते. मात्र म्हाडाच्या घराची किंमत किमान २७ लाख असली पाहिजे, अशी मुंबईकरांची मागणी आहे.