मुंबई : महानगरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्यापैकी सुमारे १७ हजार अर्जदारांचा सोडतीसाठीचा प्रवेश निश्चित झालेला आहे. आतापर्यत५८ हजार नागरिकांनी विविध योजनेच्या ठिकाणी अर्ज भरला असलातरी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम जमा केली नसल्याने त्यांचा प्रवेश अद्याप ग्राह्य धरण्यात आलेला नाही. मुंबईतील ९९७ व अंध आणि अपंग प्रवर्गातील ६६ घरांसाठी ३१ मे रोजी लॉटरी काढली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी अखेरची मुदत ९ मेपर्यत असल्याने त्यासाठी आता केवळ ५ दिवसांचा अवधी राहिलेला आहे. त्यानंतर केवळ नोंदणी असलेल्या अर्ज भरता येणार आहे.म्हाडाच्या सदनिकासाठी गेल्या पंधरा दिवसापासून सोमवारी सायंकाळपर्यत ७८ हजार २२५ जणांनी नाव नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ५८ हजार ७० जणांनी विविध प्रवर्गात अर्ज भरलेले आहेत. मात्र आतापर्यत १६ हजार ८४५ जणांनी आॅनलाईन किंवा डीडीद्वारे अनामत रक्कम भरुन प्रवेश निश्चित केला आहे. त्यापैकी मिरा रोड येथील अंध व अपंगासाठी असलेल्या फ्लॅटसाठी अर्ज केलेल्याची संख्या १२५ आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १४ मेपर्यत आहे. अर्ज व डी.डी. भरण्यासाठी २० मे पर्यत मुदत आहे. मुंबई बोर्डाकडून अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील एकुण ९९७ घरांचा समावेश आहे. त्याचबरोेबर अंध व अपंग प्रवर्गातील आरक्षित ६६ फ्लॅटची सोडत यावेळी काढली जाणार आहे. ३१ मे रोजी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात सोडत काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)
म्हाडा घरांसाठी १७ हजार इच्छुकांचा प्रवेश निश्चित
By admin | Updated: May 5, 2015 02:40 IST