Join us

म्हाडा : ९० टक्के गाळेधारकांना देयकाच्या प्रतींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:10 IST

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर स्थित वसाहतीमधील गाळेधारकांसाठी सेवाशुल्काचे देयक प्राप्त होणे आणि देयक भरण्यासाठी ...

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर स्थित वसाहतीमधील गाळेधारकांसाठी सेवाशुल्काचे देयक प्राप्त होणे आणि देयक भरण्यासाठी ई-बिलिंग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. गाळेधारकांना देयकाची प्रत प्रत्यक्षरीत्या वाटप करण्यात आली असून, साधारणत: ९० टक्के गाळेधारकांना देयकाच्या प्रती वाटप करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गाळेधारक हजर नसल्याने, देयक घेण्यास नकार दिल्याने, तसेच देयकात तफावत असल्याचे सांगितल्याने १० टक्के देयकाचे वाटप पूर्ण होऊ शकलेले नाही.

म्हाडाकडून प्राप्त माहितीनुसार, देयकाच्या राईट साईड ऑफ द टॉप येथे कंझ्युमर नंबर नमूद करण्यात आला असून, कंझ्युमर नंबर हा अल्फाबेट व अक्षर स्वरूपात नमूद करण्यात आला आहे. शिवाय ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी गाळेधारकांच्या प्रोफाईलमध्ये झाल्यानंतर पुढील देयके गाळेधारकाच्या ई-मेल आयडीवर प्राप्त होतील. ज्या गाळेधारकांना देयके वाटप करण्यात आली आहेत त्यांच्याकडून ई-मेल व भ्रमणध्वनी क्रमांकाचे संकलन केले जात आहे. सदर माहिती ई-बिलिंग प्रणालीवर अद्ययावत आहे. पुढील बिले गाळेधारकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जातील. ई-बिलिंग प्रणालीच्या वेबसाइटवर कंझ्युमर नंबर टाकून देयक पीडीएफ स्वरूपात तसेच प्रिंटद्वारे मूळ प्रत प्राप्त करून घेता येते. ई-बिलिंग प्रणाली वापराबाबत म्हाडाच्या संकेतस्थळावर व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यामध्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.