Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज मेट्रोची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम उपनगरातील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गासाठीच्या मेट्रो रेल्वेची चाचणी सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम उपनगरातील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गासाठीच्या मेट्रो रेल्वेची चाचणी सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मेट्रोच्या आकुर्ली स्थानकावर घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर चार महिने मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जातील. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यांत सुरू होतील. डहाणूकर वाडी ते आरे हा सुमारे २० किमी लांबीचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ मध्ये, तर उर्वरित संपूर्ण मार्ग जानेवारी २०२२ मध्ये सुरू होईल. या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करू शकतील.

मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल. याशिवाय प्रत्येक डब्यात चार जागा महिलांसाठी राखीव असतील. मेट्रो २ अ हा मार्ग दहिसर पूर्व ते डी. एन. नगर असा आहे. दहिसर येथे मार्ग ७, शास्त्रीनगर येथे ६, डी. एन. नगर येथे मार्ग ७ सोबत जोडला जाईल. मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूने जाईल. हा मार्ग अंधेरी येथे मार्ग १, जोगेश्वरी जेव्हीएलआर येथे मार्ग ६ आणि दहिसर येथे मार्ग २ अ सोबत जोडला जाईल.

................................................